top of page

यशस्वी औद्योगिक वास्तुशास्त्राचा “पासवर्ड”

Updated: Jun 16, 2023




एकविसाव्या प्रगत शतकात, औद्योगिक वि




श्वात पाऊल टाकताना…


वास्तु व वास्तु परिसरातील पवित्रता, अनुकूलता ही कुटुंबात, व्यवसायात समृध्दि, भरभराट निर्माण प्रेरक ठरते. हीच समृध्दि, भरभराट आणि हेच पावित्र्य आपल्या कौंटुबिक म्हणा वा औद्योगिक वास्तुत निर्माण झाले की अपयश, नुकसान वा अशांतता, नकारात्मकता असले प्रकार आपल्या पवित्र वास्तुत घडूच शकत नाहित, नव्हे तर ते इथे कदापि डोकावत देखील नाहित. कारण इथे असतो वास्तुदेवतेचा सहवास, ही वास्तुउर्जा आणि हा सहवास जाणतो तो वास्तुशास्त्राभ्यास.होय, एकविसाव्या प्रगत शतकात औद्योगिक विश्वात पाऊल टाकताना, आज विशेषत: आपण आपल्या औद्योगिक, कारखान्याच्या वास्तु व वास्तु परिसर विषयक शुभ आणि लाभदायी शास्त्रोक्त वास्तुशास्त्राबद्दल बोलायचे झालेच तर, साहजिकच कोणत्याही इन्डस्ट्रीतील तुमची कारखान्याची, फॅक्टरीची जागा, वास्तु ही पवित्र, शुभ आणि लाभदायी असावी, तिथला परिसर आणि सभोवताल हा पूरक आणि उद्योग-व्यवसायासाठी पोषक असावा असं कुणा उद्योजकाला बरं वाटणार नाही?…व नेमके याचसाठी आदित्य वास्तुचे अनुभवसिध्द वास्तुशास्त्र आणि वास्तुरत्न पुरस्कार प्राप्त, वास्तुशास्त्र तज्ञ श्री. संतोष राठी गेली अडीच दशके काम करताहेत. ——————————————————————————————————————————————


औद्योगिक क्षेत्रातील फॅक्टरीज्, लघुद्योग स्वरुपाती




ल वास्तुंच्या मागणीत लक्षवेधी वाढ…


नवनवीन कमर्शियल कॉम्प्लेक्स किंवा औद्योगिक संकुलातील ऑफिसेस्, फॅक्टरीज, कारखान्यांच्या स्वरुपातील वास्तुंच्या मागणीत लक्षवेधी वाढ झाली आहे. जागतिकीकरण आणि झपाट्याने वाढणार्‍या अर्थव्यवस्था व अर्थसुविधामुळे उद्योग व्यवसाय उभारणे पूर्वीपेक्षा जितके गरजेचे तितकेच सहजसुलभ बनले आहे आणि त्यानुसार स्वत:च्या औद्योगिक, मोठमोठ्या कारखान्यांपासून ते लघु उद्योग व्यावसायिक वास्तुंच्या मागणीकडे उद्योजकांचा कल अभूतपूर्वरित्या वाढलेला आहे. कारखान्यांच्या सदोष वास्तुंचा संपूर्ण कायापालट घडवून आणण्यासाठी…औद्योगिक वास्तुशास्त्र तरीपण यातही प्रत्येक औद्योगिक क्षेत्राच्या संबधित व्यावसायिक संकुलातील सर्वच जागा, वास्तु किंवा कारखाने, उद्योग, व्यवसाय हे यशस्वी झाले आहेत असे नाही. अनेक कारखान्यांना उत्पादनांशी संबधित तर कारखानदारांना कर्मचाऱ्यांपासून व्यवसायाच्या फायद्या तोट्यांर्पंत, अनेक प्रकारच्या आव्हानांशी सामना करावा लागतो. निश्चितच तुमच्या या कारखान्यांच्या, औद्योगिक वास्तु आणि परिसरातील वास्तुशास्त्राधारित तत्वे, नियमांचे पालन न केल्या गेल्यामुळे किंवा नकळत वास्तुदोषांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे सातत्याने पदरी येणारे अपयश, परिणामी होणारे नुकसान, जाणवणारी नकारात्मकता, अशांतता, पदोपदी घडणाऱ्या प्रतिकूल घटना याठिकाणी सातत्याने घडत असतात. हे प्रकार टाळन्यासाठी किंवा अशा सदोष फॅक्टरीजच्या जागा, वास्तुंच्या नुकसानकारक सद्यस्थितीत संपूर्ण कायापालट घडवून आणण्या




साठी औद्योगिक वास्तुशास्त्र मोठी भूमिका बजावते. केवळ उच्चतम दर्जाचे उत्पादनच नव्हे तर कारखान्याच्या गुणवत्तेसाठी आंतरराष्ट्रीय5 बेंचमार्क देखील या औद्योगिक वास्तुशास्त्रामुळे शक्य होतात, सहाय्यभूत ठरतात. औद्योगिक वास्तुशास्त्रातील अनुभवसिध्द ६ यशस्वी सिग्मा बेंचमार्क आणि फॅक्टरी शेडसाठीच वास्तुंचे महत्व… कारखाना किंवा कुठल्याही उद्योग व्यावसायिक शेडचे आकारमान विचारात न घेता, बांधकामाच्या वेळी अशा जागा किंवा शेडस् मध्ये औद्योगिक वास्तुशास्त्राचे महत्व विचारात घेऊन त्यातील तत्वांचा प्रयग वा प्रभाव हा अधिक लाभदायी ठरतो. उत्पादन, प्रशासन, वित्त, कामगार इ.विषयक समस्या टाळण्यासाठी सहाय्यकारी ठरु शकतो. फॅक्टरी शेडसाठीची वास्तु ही औद्याोगिक वास्तुशास्त्रामुळे कमीत कमी प्रयत्नात व जास्तीत जास्त उत्पादन घेन्यास मदत होते. कारखाना चालविणच सर्व प्रक्रिया समानरीत्या संक्रमित झाल्याने नक्कीच हे साध्य होऊ शकते. प्रत्येक उद्योगाचा त्यासंबधित उत्पादने व उत्पादन प्रक्रियेत अद्वितीय राहन्याचा प्रयत्न असतो. परंतु त्यासाठी वेगवेगळे औद्योगिक फॅक्टरी वास्तुंसाठी संबधित वेगवेगळ्या उद्योग व्यवसायानुसार असणाऱ्या तत्व, नियमांचा अवलंब करणे गरजेचे आहे. उत्पादन चक्रातील प्रत्येक प्रक्रिया जितकी महत्वाची आहे तितकच विविध उद्योगांसाठी, काही (औद्योगिक वास्तुशास्त्रासारख्या) इतर प्रक्रियासुद्धा अधिक महत्वाच्या ठरतात. उदा. अन्न प्रक्रिया उद्योगासाठी , पॅकेजिंग व त्याहून खाद्य उत्पादनांची चव आणि तितकीच गुणवत्ता महत्वाची ठरते. दुसरीकडे लक्झरी घड्याळे किंवा तत्संबधित अ‍ॅक्सेसरीज या उद्योगांसाठी इतर कोणतही प्रक्रियां पेक्षा आधुनिक डिझाईन्स व स्टाईल्स महत्त्वाच्या ठरतात. अशाप्रकारे प्रत्येक उद्योगासाठी गरजे




नुसार औद्योगिक शेडस् व पर्यायाने त्यासाठीचे औद्योगिक वास्तुशास्त्र महत्वाची भूमिका बजावते. उदा. फॅक्टरी ले-आऊटसाठी वास्तु तार करताना, लोखंड आणि स्टीलचे उत्पादन करणार औद्योगक शेडस्साठी अग्निशामक क्षेत्र, म्हणजे दक्षिण-पूर्व भाग काळजीपूर्वक तार करणे. आवश्क आहे. कारण स्टील उद्योगांसाठी वास्तुचा विचार केल्यास लोह गरम करणे आणि वितळवणे ही सर्वात महत्वाची प्रक्रिया आहे. दुसरे म्हणजे उच्च दर्जा गुणवत्तेची खात्री करणसाठी औद्योगिक शेडस’धील दर्जेदार औषधे उत्पादनांसाठी पश्चिम आणि दक्षिण दिशा (झोन) हा दोषमुक्त असणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे, जरी तुम्ही छोट्या मोठ्या कारखान्यांसाठी वास्तु खरेदी करीत असाल तर त्यामधील औद्योगिक वास्तुशास्त्राधारित तत्वे लक्षात घेणे आवश्क आहे. शेड उभारणे, पायऱ्या तयार करणे, पाणवठे वसवणे, यंत्रसामुग्री स्थापित करणे, वस्तुं, साधनसामुग्रीचे नियोजन करणे व ग्राहकांपर्यंत पोहोचवणे यासारख्या बाबींचा यात समावेश होतो. कारखाने, फॅक्टरीजच्या ऑफिसेससाठीच्या वास्तु किंवा मुख्य प्रवेशद्वारांची उभारणी करीत असतानाही कारखानंचे लेआऊटस्, डिझाईन्स तार करताना त अनुषंगाने दक्षता घेणे आवश्क आहे.


फॅक्टरीज्, ऑफेसेसच्या वास्तुसाठीच्या महत्वाच्या ९ टिप्स…


१) उद्योगांसाठीच वास्तुंचे सिध्दांत कोणतेही बांधकाम, औद्योगिक शेड व आजुबाजुच्या जमीन भागाला उतार असावा हेच ठामपणे सांगतो. कोणतीही उद्योगवास्तु असो वा औद्योगिक शेड, ती उभारताना ज्या औद्योगिक भूखंडावर शेड बांधण्यात येणार आहे. अशा वास्तु व जागेकडे वास्तुशास्त्रदृष्ट्या काळजीपूर्वक पाहूनच निर्णय घ्यायला पाहिजे. किंवा तो घेण्यापूर्वी उद्योग वास्तुशास्त्राचे विहित नियम आणि मार्गर्शक तत्वे ही पाळली गेलीत का? याची खात्री केल्यास, हेच उद्योग




वास्तुशास्त्र तुमच्यासाठी अधिकाधिक प्रभावी व लाभदायकच ठरते. औद्योगिक वास्तुशेडसाठी वास्तुचे नियोजन करताना, शेडच्या छताला उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे उतार असला पाहिजे. जो वास्तुशास्त्रदृष्ट्या सर्वोत्तम समजला जातो, कारण पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र हे उत्तर-पश्चिम दिशेने वाहते. त्यामुळे चुंबकीय प्रवाहाचा उत्तम लाभ घेण्यासाठी ईशान्य उतार ठेवणे फाययदेशीर ठरते. शिवाय पावसाचे पाणीसुध्दा वाहून जाण्याचा तांत्रिक उद्देशही त्यामागे आहेच. याऊलट दक्षिण किंवा दक्षिण-पश्चिम दिशेला उतार असलेला औद्योगिक भूखंड निश्चितच प्रतिकूल व अनुचित असतो.


२) फॅक्टरीतील विद्युत उपकरणे आणि निंत्रणे व हिटींग सिस्टिम्स…


इलेक्ट्रिक कन्ट्रोल पॅनेल्स, ट्रान्सफार्मर्स तसेच जनरेटर्स ही प्रत्येक फॅक्टरीच छताखालील विशेष मानके, मालमत्ता आहेत. उत्पादन प्रक्रियेच्या नियमित कामकाजात त्यांची ठिकाणे, जागा देखील तितकच महत्वाच्या भूभूिका बजावतात. फॅक्टरी ले-आऊट व वास्तुची डिझाईन्स विचारात घेताना त्यांच्या प्लेसमेंटस्, जागा वास्तुशास्त्रानुसार दक्षतापूर्वक निश्चित केल्या पाहिजेत. ट्रान्सफार्मर्स व कन्ट्रोल पॅनेल्स यासारखी महत्वपूर्ण विद्युत उपकरणे वास्तुशास्त्रानुसार योग्य त्या ठिकाणी बसवणे हा देखील कारखाण्याच्या वास्तुतील महत्वपूर्ण भाग आहे. कारण ही सर्व विद्युत उपकरणे, हिटींग सिस्टिम्स या अग्निसारख्या महत्वपूर्ण घटकाचे प्रतिनिधित्व करतो. उदा. रासायनिक कारखान्यासाठीची वास्तु तयार होत असताना त्यातील बॉयलरची जागा दक्षतापूर्वक निश्चित केली पाहिजे. कारण बॉयलर हा सुध्दा आगीचीच एक प्रकिया आहे, त्यासाठी तो दक्षिण आणि दक्षिण पूर्व ठेवणे उचित ठरते. जर तो उत्तर किंवा ईशान्य सारख्या झोन मध्ये चुकीच्या पध्दतीने ठेवला गेला तर उत्पादन प्रकियेस गंभीर धोका पोहोचू शकतो. उत्तराभिमुख कारखान्यासाठीचे विद्युत उ




द्योग वास्तुशास्त्र काय सांगते?…


बहुतेक कारखान्यांमधील वास्तुशास्त्राअभावी उद्भवणारी ही एक मोठी समस्यां आहे. कारण उत्तराभिमुख कारखान्यातील ट्रान्सफार्मर्स हे अगदी वास्तुतील समोरच्या भागात बसविलेले असतात, ज्यामुळे वारंवार अनेक समस्या उद्भवतात. तसेच कंपनीतील जनरेटर्स व संबधित विद्युत बॅकअप सिस्टिम्स या अतिमहत्वाच्या भूभूिका बजावतात, त्यामुळे जनरेटर्सच्या निश्चित स्थानांबाबत विचार करता ते वायव्य दिशेला असल्यास विना व्यत्यय सुरळीत चालतात.


३) फॅक्टरीतील मशिनरीजसाठीची योग्य वास्तु, प्लेसमेन्ट व दिशानिर्देश…


फॅक्टरीतील मशिनरीजसाठीच्या वास्तुशास्त्राबाबत लोकांच्यात एक गोड गैरसमज असा आहे की कारखाण्याच्या दक्षिण पश्चिम बाजुंचा कोपरा हा नेहमी जड असला पाहिजे आणि त्या अनुषंगानेच सर्व मशिनरीज् या केवळ दक्षिण पश्चिम भागातच ठेवले पाहिजेत. वास्तविक पाहता, प्रचलित औद्योगिक वास्तुशास्त्रानुसार हा तर्क निराधार आहे. कारण प्रत्येक कारखान्याची वास्तु, उद्योग वा व्यवसाय हा वेगवेगल्या प्रकारचा असतो, त्यानुसार तची यंत्रणा सुध्दा ही विविध पध्दतीची असते. औद्योगिक वास्तुशास्त्र व मार्गदर्शक तत्वांनुसार यंत्रसामुग्रींचे वजन व त्यांचे स्थान ठरवायची नव्हे तर तसाठीच प्रक्रियेचा एक भाग आहे. उदा. स्टोन क्रशर कारखान्यांमध्ये संबधित मशिनरी ही उत्तर पश्चिम कोपऱ्यात ठेवणे उचित व




उत्तम ठरते. कारण रुद्राच्या ऊर्जा क्षेत्र वास्तुपुरुष मंडळानुसार उत्तर पश्चिमेकडील ऊर्जा क्षेत्र हे क्रशिंग मशिनरीजचे कार्य सक्षमरित्या नियंत्रित करते. अशाप्रकारे जिथे फॅक्टरी मशिनरीज ठेवायच्यात त्या वास्तु किंवा जागेसाठी मशिनरीजचा उद्देश व वापर काळजीपूर्वक विचारात घेणे गरजेचे आहे.


४) कारखान्यांच्या मुख्य प्रवेशद्वार व सीमा भिंतींसाठीचे वास्तुशास्त्र… कारखान्याचे वास्तुशास्त्राधारित मुख्य प्रवेशद्वार हे त्यासंबधित उद्योग व्यवसायाच्या युनिटसाठी यश आणि अपयशातील निर्णायक घटक ठरु शकते. वास्तुशास्त्रातील अंगठ्याच्या नियम व निकषानुसार कंपन्यांचे मुख्य प्रवेशद्वार बसविण्यासाठी ३० ते ४०% वेटेज दिले जाऊ शकते, जमेची बाजू ठरु शकते. चारही दिशांना कंपनीची योग्य स्थितीतील मुख्य प्रवेशद्वारे अनुकूल असतात. औद्योगिक वास्तुशास्त्र कारखान्याचे मुख्य प्रवेशद्वार हे पूर्व किंवा उत्तराभिमुख ठेवण्यास प्राधान्य देते व शुभ तसेच लाभदायी मानते. सर्वसामान्यतः कौटुंबिक वास्तु घेताना देखील लोक उत्तराभिमुखी किंवा पूर्वाभिमुखी घर खरेदीलाच पसंती दर्शवितात. कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारासाठी दर्शविण्यात येणारी सर्वोत्तम ठिकाणे… औद्योगिक वास्तशास्त्रानुसार कारखान्यांची लाभ व शुभदायी फलनिष्पत्ती ही केवळ त्यांच्या दर्शनी दिशेवरंच अवलंबून नसते तर मुख्य प्रवेशद्वाराच स्थानावर तसेच प्लॉटमधील इतर सर्वच संरचनांवर देखील अवलंबून असते. दक्षिणाभिमुखी फॅक्टरीजच्या वास्तुविषयक




शेकडो केसेसवर आम्ही काम केल्यानंतर आमच्या लक्षात असे आले आहे की उद्योग व्यवसायासाठी वास्तुशास्त्राचे योग्य नियम व तत्वे पाळली गेल्यास दक्षिणाभिमुख कारखाने, कंपन्यादेखील यशस्वीपणे उद्योग करु शकतात. आदित्य वास्तु अर्थात वास्तुशास्त्र तज्ञ संतोष राठी यांचे याबाबतचे काही निष्कर्ष व त्यांनी तपशिलवार दिलेल्या खालील माहितीप्रमाणे आपण तसा अनुनय केला तर, मुख्य प्रवेशद्वाराबाबत अनुदानातून कंपनीच्या उत्कर्षात एक तर अभूतपूर्व वाढ होऊ शकते किंवा मोठे नुकसान, हे नक्की कोणत्या परिस्थितीत व केव्हा नुकसानकारक ठरु शकते ते आपणांस पाहता येईल, असे संतोष राठी पुढे सांगू इच्छितात. ते म्हणतात अशाच एका कंपनीच्या क्लाएंटने जेव्हा आम्हाला दक्षिण-पश्चिम दिशेला असलेल्या कारखान्यांच्या वास्तुंमध्ये काम करण्यासाठी बोलावले तेव्हा तो कारखाना प्रचंड तोटा आणि कर्जाच्या बोजाखाली सापडलेला होता, जवळ जवळ बंद पडण्याच्याच मार्गावर होता. कारखान्याच्या मुळ वास्तुसंदर्भातील वास्तुशास्त्राधारित आराखडे तयार करताना, आमच्या लक्षात आले की नेमक्या दक्षिण-पश्चिम दिशेला असलेले कारखान्याचे मुख्य प्रवेशद्वार हे प्रतिकूल सद्यस्थितीचे एक प्रमुख कारण आहे. आम्ही याच समस्येवर प्राधान्याने लक्ष केन्द्रित करुन तिचे वास्तुशास्त्राधारित निराकरण केले व परिणामी या कारखान्याची दिशा आणि दशा दोन्ही तात्काळ बदलल्या व नंतर कारखाना पुन्हा यशस्वीरित्या पूर्वपदावर आला.त्यामुळे साहजिकच कोणत्याही कारखान्याच्या वास्तुसाठी त्याचे मुख्य प्रवेशद्वार हे फार मोठी भुमिका बजावते. औद्योगिक वास्तुशास्त्र दृष्ट्या कारखान्यांच्या कंपाऊंड वॉल्स व शेडसच्या सीमारेषांचे महत्व… औद्योगिक वास्तुशास्त्र दृष्ट्या उद्योग वास्तुंच्या कंपाऊंड वॉल्स व शेडच्या सीमारेषासुध्दा तितक्याच महत्वाच्या असतात. कारण यांच्या हद्दीमध्येच उर्जा क्षे




त्रांची परस्पर क्रिया घडत असते. त्यामुळे औद्योगिक शेडस् व कंपाऊंड वॉल्स बांधणसाठीची काही मार्गदर्शक तत्वे व नियम उद्योग वास्तुशास्त्र सांगते व त्यांचे पालन करणे गरजेचे ठरते. फॅक्टरी शेडसच्या दक्षिण व पश्चिमेकडील सीमा भिंती या उत्तर आणि पूर्वेकडील भिंतींपेक्षा उंच आणि जाड असाव्यात. दक्षिणाभिमुखी वास्तु वा घरांसाठी हेच नियम लागू होतात. कारण सूर्याचा मार्ग पूर्वेकडून पश्चिम दिशेकडे व दक्षिणेकडून पश्चिमेकडे असा मार्गक्रमण करतो. दुपारच्या सुमारास व सूर्यास्तापूर्वी सूर्याची उष्णता तीव्र असते. जेव्हा सूर्य दक्षिण व दक्षिण पश्चिमेला असतो तेव्हा वातावरणातील अतिनील किरणोत्सर्गात वाढ होते. त्यामुळे उर्जा निर्मितीमध्ये नैसर्गिकरित्या व्यत्यय येतो. याऊलट उत्तर आणि पूर्वेकडील खालच्या व बाजूच्या पातळ भिंती या सकाळी व दुपारच्या वेळी कायदेशीर इन्फ्रारेड किरणांचे शोषण करण्यास मदत करतात. अशाप्रकारे कंपाऊंड वॉल व सीमारेषांच्या वास्तुशास्त्र नियमांनुसार कारखान्याच्या कंपाऊंड वॉल्सच्या भिंतींची उंची आणि जाडी महत्वाची आहे.


५) फॅक्टरी, ऑफिसच्या वास्तुतीतील स्टाफ केबीन्स व लेबर क्वार्टर्सचे वास्तुशास्त्र दृष्ट्या स्थान… फॅक्टरी ऑफिससाठीची वास्तु ही उद्योगवास्तुशास्त्र दृष्ट्या सर्वात महत्वाची भूमिका निभावते. एका छोट्या कारखान्यात पाच किंवा सहा लोक काम करु शकतात. तर मोठ्या कारखान्यांच्यात शेकडो लोकांचा समावेश असतो. कारखान्याच्या प्रमाणात असणाऱ्या कामगारांवर अवलंबून असल्याने त्यांच्या नियुक्तीचा निर्णय काळजीपूर्वक घेण्याची जबाबदारी कारखान




दारांवर असते. फॅक्टरीमध्ये प्रशासकीय क्षेत्र, ऑफिसेस् गार्डरूम्स, लेबर क्वार्टर्स यासारखी महत्वाची क्षेत्रे असतात. ज्यांची रचना तुम्ही वास्तुतत्वांनुसारंच केली पाहिजे. वास्तविक पाहता कर्मचारी निुक्तीबाबतचा उद्योग वास्तुशास्त्रात कोणत्याही प्रकारचा ठोस, निश्चित असा नियम नाही, आदित्य वास्तु तसेच अनेक वास्तुतज्ञ व सल्लागारांचे हे मत आहे. तुम्ही तुमच्या लघुद्योग किंवा मोठ्या उद्योग व्यावसायिक कारखान्यासाठीच्या वास्तु शोधात असाल तर कामगारांबरोबरंच तुमच्या केबिनचे स्थान ठरवताना व तिची कार्ये पाहून वास्तुशास्त्राधारित निर्णय घेणे गरजेचे आहे. सर्वसामान्य नियमांनुसार कारखानदार व ओनर्सची ऑफिसेस् ही पश्चिम किंवा दक्षिण दिशांना असणे शुभ व लाभदायी मानले जाते. एकूणंच यासाठी पश्चिम दिशा शुभ व लाभदायी मानली गेली आहे. तर दुसरीकडे दक्षिण ही दिशा उद्योग व्यवसायाच्या अधिकृत स्थानासह नाव आणि प्रसिध्दी मिळवून शकते. लेबर क्वॉर्टर्सबाबत विचार करता ते कारखान्याच्या दक्षिण पूर्व कोपऱ्यात बांधणे अनुकूल ठरते. कारण ही दिशा अग्निमय ऊर्जां निर्माण करते व ही ऊर्जा उत्पादक व उत्पादन करणाऱ्या श्रमिकांच्या अकार्यक्षमतेला सदोदित प्रेरित व उत्साही ठेवते. जेव्हा कार्यालयीन (ऑफिसेस्) वास्तुसाठी औद्योगिक वास्तुशास्त्र दृष्ट्या विचार केला जातो तेव्हा कर्मचाऱ्यांच्या कामांचा प्रकार लक्षात घेऊन ती निश्चित केली पाहिजे. उदा. तांत्रिक मशीन ऑपरेटर्सची जागा (केबीन) ही दक्षिण पश्चिम दिशेला असली पाहिजे, जेणेकरुन संबधित तांत्रिक कर्मचाऱ्यांची कुशलता वाढीस लागेल. त्याचबरोबर कारखान्याचे क्षेत्र अधिक अनुकूल असावे यासाठी पूर्व दिशेला महत्व दिले गेले आहे. कारण ही सूर्याची उगवती दिशा असल्याने कामकाजातील नियंत्रण व आवश्यक ती प्रशासकीय कौशल्य प्राप्त होणसाठी ती सुयोग्य ठरते. त्यानंतर गार्डरूम्सच्या वा




स्तुसाठी दक्षिण-पूर्व-दक्षिण या दिशांचे स्थान उचित कामगिरी बजावते.


६) कच्चा माल व तार उत्पादनांसाठीच्या अनुकूल जागांविषयीचे उद्योग वास्तुशास्त्र…


कारखान्यातील सर्वात महत्वाचे घटक म्हणजे कच्चा माल आणि पक्का माल म्हणजे फॅक्टरीतून तार होऊन आलेली उत्पादने ज्यावर कारखाना चाललेला असतो किंवा टिकलेला असतो. ज्यासाठी त्यांची ठिकाणे (गोडाऊन्स) यांची योग्यरीत्या व औद्योगिक वास्तुशास्त्र दृष्ट्या निवड करणे महत्वाचे ठरते. कारखान्यांच्या पश्चिम झोन मध्ये कच्चा माल ठेवणे उत्तम असल्याचे वास्तुशास्त्र सांगते. या कच्चा मालामध्ये भरपूर द्रव असल्यास किंवा तो द्रवरुप असल्यास, तुम्ही ते उत्तर किंवा ईंशान्य दिशेला ठेवू शकता. तार उत्पादने किंवा माल ठेवण्यासाठी सर्वोत्तम दिशा विचाराल तर याचे उत्तर उद्योग वास्तुशास्त्र सांगते की पश्चिम दिशा. कारण ही दिशा जी तयार मालाची किंवा उत्पादनांची सततची हालचाल अर्थात ने-आण यांचा प्रवाह सुनिश्चित करते. त्याचबरोबर या दिशेच बाजूला येणाऱ्या वायव्य कोनामध्ये वायु, तत्व किंवा वायु तत्वांची ऊर्जा साठवलेली असते. हवेतील घटक व त्यांची गुणवत्ता ही सतत प्रवाही असल्याने, ही दिशा तयार मालाचा नियमित प्रवाह आणि हालचाली सुनिश्चित व सुरक्षित राखते.


७) कारखान्यांच्यातील पाणी, बोअर्स, शौचालये व सेप्टिक टँक्सची उचित स्थाने…


औद्योगिक वास्तुशास्त्र हे, कारखान्यातील पाण्याचे बोअरिंग, ओव्हरहेड किंवा ओव्हरलोड पाण्याच्या टाक्या, टॉयलेटस् तसेच सेप्टिक टँकस् यासाठीच्या अनुकूल, प्रतिकूल जागांतील फरक अचूकपणे सांगू शकते. कारखान्यात वॉटर बोअरिंग बसविण्यासाठी उत्तर, ईशान्य, पूर्व व पश्चिम दिशा अनुकूलता दर्शवितात. कारण हे दिशानिर्देश जल घटकांचे समर्थन करता




त, त्यांची वाढ आणि उचित संधीचे प्रतिनिधीत्व करतात. याऊलट ओव्हरहेड किंवा ओव्हरलोड पाण्याच्या टाक्या पृथ्वीतंर्गत जलघटकांचे प्रतिनिधीत्व करतात. म्हणून कारखान्यासाठीच्या वास्तुतंर्गत याकरिता प्रभावी दिशा म्हणाल तर दक्षिण-पश्चिम किंवा पश्चिम झोन. जिथे हे जलघटक व संबधित विभाग स्थानापन्न केले तर ते नक्कीच ऊचित व फायदेशीर ठरतात. एक नक्की की कारखान्याच्या ईशान्येला कोणत्याही ओव्हरहेड पाणच्या टाक्या ठेवू नयेत. तसेच टॉयलेटस् किंवा सेप्टिक टँकचा वापर मलमुत्रासह, सांडपाणी तसेच द्रव पदार्थांची विल्हेवाट लावण्यासाठी केला जात असल्याने अशा सुविधा किंवा व्यवस्थांसाठी दक्षिण-पश्चिम किंवा वायव्य-पश्चिम दिशा यासाठी संपूर्ण अनुकूलता दर्शवितात, प्रभावी ठरतात.


८) औद्योगिक वास्तुशास्त्राधारित वाहन पार्किंग सुविधा आणि व्हावा व्यवस्था…


औद्योगिक वास्तुशास्त्र व नियमांनुसार जड किंवा हलक्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग क्षेत्र असावे. जड वाहनांचे पार्किंग क्षेत्र हे शक्तो कारखानच बाहेरील भागात असावे, ते आत करणे अपरिहार्य अथवा आवश्यक असल्यास दक्षिण व पश्चिम झोन मध्ये करणे उचित ठरते. स्कूटर किंवा सायकल्स यासारख्या हलक्या वाहनांसाठी उत्तर-पश्चिम दिशेला पार्किंग असल्यास उत्तमच. मात्र पार्किंग सुविधा किंवा व्यवस्था या ईशान्यकडील क्षेत्रात करणे टाळण्याचा सल्ला उद्योग वास्तुशास्त्र आवर्जुन देते.


९) कारखान्यातील पॅन्ट्री व किचन, वास्तुतील कोणत्या दिशेला असाव्यात?…


फॅक्टरीतील भटारखाना, कॅन्टिन किंवा




पॅन्ट्रीज या त्यांच्यातील खाद्यान्नाचे व अग्निचे घटक संतुलित ठेवन्यासाठी त्यांचे स्थाने ही योग्य ठिकाणी असली पाहिजेत. वास्तुशास्त्राधारित ती निश्चित केल्यास नक्कीच ते हितकारक ठरते व त्यासाठी दक्षिण-पूर्व-दक्षिण दिशा उचित व प्रभावी ठरते. मात्र स्वंपाकगृहात काळ्या किंवा निळ्या रंगांच्या भिंती, ग्रॅनाईट, स्लॅब्ज किंवा टाईल्स लावणे टाळण्याचा सल्ला उद्योग वास्तुशास्त्र देते. कारण हे रंग पाण्याच्या घटकांचे प्रतिनिधित्व करतात व किचन्स, पॅन्ट्रीजमधील अग्निशामक घटकांना विरोध दर्शवितात. —————————————————————————————————————————————–


आदित्य वास्तु व वास्तुरत्न श्री. संतोष राठी यांच्या या औद्योगिक शास्त्राधारित अनुमानांचे सार व निष्कर्षं… तुम्हीसुध्दा तुमचा नवीन कारखाना किंवा फॅक्टरी उभारण्याचे नियोजन करीत असाल अथवा तुमच्या सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या उद्योग व्यावसायिक कार्यक्षेत्रातील कारखान्यांच्या ठिकाणी यासंदर्भातील काही प्रतिकूल आव्हाने असतील, सदोष प्रणाली, त्रुटी किंवा सातत्याने नुकसानकारक घडणाऱ्या बाबींबाबत तुम्ही साशंक असाल तर?…औद्योगिक वास्तुशास्त्राधारे खात्रीपूर्ण शुभ व लाभदायी व्यावसायिक शाश्वती मिळवा, प्रगतशील उद्योजक म्हणून तुम्हीसुध्दा तुमच्या औद्योगिक विश्वात अभिमानाने मिरवा!… आजंच आदित्य वास्तुकडे संपर्क साधा अथवा कॉल किंवा ऑनलाईन शंका सभाधानासाठी सल्ला घ्या आणि तुमचाही उद्योग व्यवसाय, कारखाना निर्विघ्नपणे व उत्तम उर्जा आणि तेजीत चालवा किंवा नवीन कारखाना सुरु करण्यापूर्वीच औद्योगिक वास्तुशास्त्राधारे खात्रीपूर्ण शुभ व लाभदायी व्यवसायाची शाश्वती मिळवा. निश्चित आणि निश्चिंत शस्वी व्हा, प्रगतशील उद्योजक म्हणून औद्योगिक विश्वात अभिमानाने मिरवा!…

Recent Posts

See All

Comments


bottom of page